Posts

AshishThoughts

​ "If you are born poor, it is not your mistake. But if you die poor it is your mistake.:- "जर तुम्ही गरीब जन्माला आलात तर ती तुमची चूक नाही. पण जर तुम्ही गरीब राहून मराल तर ती तुमची चूक आहे. #MondayMotivation #Ashishthoughts #WorldsparrowDay #PositiveVibes #maharashtra
  Life is really nothing without #love and care. Give it to everyone but don’t expect it back, because it’s a ‘Feel’ not a ‘Deal’ प्रेम आणि काळजीशिवाय जीवन खरोखर काहीच नाही. ते प्रत्येकाला द्या पण ते परत मिळण्याची अपेक्षा करू नका,कारण ती 'डील' नसून 'फील' आहे #PositiveVibes

Motivation

​ "Be more concerned about what's right rather than who's right." - Brian Tracy "कोण बरोबर आहे यापेक्षा काय बरोबर आहे याची जास्त काळजी घ्या."  - ब्रायन ट्रेसी

प्रेम म्हणजे काय...(What is Love)

प्रेम म्हणजे नेमकं काय असतं... त्याच्या बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या परिभाषा सांगितल्या आहेत. प्रेम हा विषय येताच डोळ्यासमोर येतो ते म्हणजे एक प्रेमी जोडपं जे खूप प्रयत्नातून लग्न वगैरे करतात अस काहीतरी चित्र डोळ्यासमोर तरंगत. प्रेम हे काही एका दिवसात किंवा एका महिन्यात होत नसत,तर ते फुलाप्रमाणे वाढत असत झाडाप्रमाणे मोठं होत असत.जस झाड मोठं होण्यासाठी त्याला अनुरूप वातावरण, वेळ,परिस्थिती याची सांगड हवी असते.तसच प्रेमाच्या बाबतीतही तसच होत असत प्रेम हे हळू हळू होत जातं ,पण हा ते कधी बदलत नाही. यात आपण आई आणि बाळाचं उदाहरण घेऊ जस की लहानपणी आपल्या आईच आपल्यावर प्रेम असत ,तसच आपलं आईवर प्रेम असतं पण तेव्हा आपल्याला जास्त काही कळत नाही,पण जस जसं आपण मोठं होत जातो तस आपल्याला कळायला लागत आणि मग ते प्रेम वाढून नात घट्ट होत जातं. माझ्या मते प्रेम करण्यापेक्षा ते निभवाव... मग ते निभवायचं कसं... आणि प्रेम म्हणजे काय...? तुम्ही कधी पाण्याला आणि लाटांना कधी वेगळं पाहिलं आहे का ...? नाही ना..! ते प्रेम आहे. तुम्ही कधी पावसाला आणि नभांना वेगळं पाहिलं आहे का..? नाही ना...! ते प्रेम आहे. प्रेम आणि आकर्षण...

मैत्री

Image

कवितेतील शब्द

तुझ्या रुपाचं वर्णन करण्यासाठी  शब्द अपुरे पडतात... तुझ्या कवितेत येण्यासाठी शब्द  माझ्याशी भांडू लागतात... सहज माझ्या कवितेतील शब्द, तुला पाहता गोठून जातात... आणि आपली मर्यादा ओलांडून, शब्द तुलाच पाहू लागतात... असे काहिक क्षण झालेत तू  माझ्या आयुष्यात येऊन...  अशीच युगे जगुयात आपण एकमेकांसोबत राहून. ..

आठवणीतला पाऊस

या बेधुंद पावसात तुझी आणि माझी पहिली भेट स्मरते.... हा आठवणीतला पाऊस मन चिंब भिजून वाहते.... तुझ्या नी माझ्या भेटीचं ऋण या पावसाशी मी फेडतो... हा आठवणीतला पाऊस तुझीच आठवण सांगून जातो... या पाऊसात तुला शोधण्यात मीच हरवून जातो... तो आठवणीतला पाऊस तुला ही काहीतरी सांगतो... तू सोडून जाता मला आभाळ भरून येते, या आठवणीतल्या पाऊसात तू, खूप काही सांगून जाते... तुला भिजतांना पाहून मला न भिजवता भिजवून जातो... तो आठवणीतला पाऊस खूप काही सांगून जातो.... त्या पाऊसात दवबिंदू समान शोधत होतो तुला, पण तू त्या प्रत्येक थेंबात विलीन होऊन जातेस... तो पाऊस नेहमीच तुझीच आठवण देऊन जातो... तो आठवणीतला पाऊस खूप काही सांगून जातो....