प्रेम म्हणजे काय...(What is Love)
प्रेम म्हणजे नेमकं काय असतं... त्याच्या बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या परिभाषा सांगितल्या आहेत.
प्रेम हा विषय येताच डोळ्यासमोर येतो ते म्हणजे एक प्रेमी जोडपं जे खूप प्रयत्नातून लग्न वगैरे करतात अस काहीतरी चित्र डोळ्यासमोर तरंगत.
प्रेम हे काही एका दिवसात किंवा एका महिन्यात होत नसत,तर ते फुलाप्रमाणे वाढत असत झाडाप्रमाणे मोठं होत असत.जस झाड मोठं होण्यासाठी त्याला अनुरूप वातावरण, वेळ,परिस्थिती याची सांगड हवी असते.तसच प्रेमाच्या बाबतीतही तसच होत असत प्रेम हे हळू हळू होत जातं ,पण हा ते कधी बदलत नाही.
यात आपण आई आणि बाळाचं उदाहरण घेऊ जस की लहानपणी आपल्या आईच आपल्यावर प्रेम असत ,तसच आपलं आईवर प्रेम असतं पण तेव्हा आपल्याला जास्त काही कळत नाही,पण जस जसं आपण मोठं होत जातो तस आपल्याला कळायला लागत आणि मग ते प्रेम वाढून नात घट्ट होत जातं.
माझ्या मते प्रेम करण्यापेक्षा ते निभवाव...
मग ते निभवायचं कसं... आणि प्रेम म्हणजे काय...? तुम्ही कधी पाण्याला आणि लाटांना कधी वेगळं पाहिलं आहे का ...? नाही ना..! ते प्रेम आहे. तुम्ही कधी पावसाला आणि नभांना वेगळं पाहिलं आहे का..? नाही ना...! ते प्रेम आहे.
प्रेम आणि आकर्षण मधला फरक...
सहाजिक आहे कुठल्याही नात्याची सुरवात ही आकर्षणानेच होते माणसाला आकर्षण हे कोणतही असू शकतो मानसिक किंवा शारीरिक.
जस की शारीरिक म्हंटल तर एखाद्याचा आवाज एखादा अवयव,केसांचा कसलाही आणि मानसिक म्हंटल तर स्वभाव,विचार समोरील व्यक्तीची बुद्धिमत्ता आणखी बरंच काही.
आकर्षण असलं की माणूस कधीच विचार करत नाही,तो सगळे निर्णय भावनेत घेत असतो त्याला समोरच्या व्यक्तीमध्ये कधीच वाईट दिसत नाही.तो शारीरिक आकर्षणात आंधळा झालेला असतो ..
त्या उलट प्रेमाचं असत... समजा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल,पण ते का...? हे व्यक्त करता येत नसेल तर समजा मित्रांनो प्रेमात पडलात तुम्ही...?ते प्रेम आहे ...
प्रेम हे नेहमी स्वच्छ आरश्यासारखं असतं त्याला माहिती असतं की समोरच्या व्यक्तीमध्ये काय वाईट काय चांगलं आहे .
प्रेमात असल्यावर नेहमी आपण आपल्या आणि समोरील व्यक्तीच्या उत्कर्षाचा विचार करत असतो.
मग एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते ते कसं ओळखता येईल...
बऱ्याच जणांना अनुभव असतीलच पण प्रेमाची जाणीव ही विविध पद्धतीने होते.जाणीव करून देण्याचा किंवा होण्याच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये अपेक्षा या वेगळ्याच असतात.जस की ती व्यक्ती आपल्याला पुरेसा वेळ देते,आपल्या आवडी निवडी जपण्याचा प्रयत्न करत असते.नेहमी आपल्या सोबत उभी असते मग प्रसंग कोणताही असो पण ती आपल्याला support करत असते.हक्काने आपल्याशी बोलत असते ,चार चौघात चूक सांगण्या ऐवजी एकटयापाशी व्यक्त करते आणि सुधारण्यास मदत करते.
मग शेवटी एवढंच सांगेल
प्रेम म्हणजे विश्वास...
माझे ज्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि ज्या व्यक्तीचे माझ्यावर प्रेम आहे ,मग ती व्यक्ती माझ्यासाठी जे काही करत असेल त्यावर माझा पूर्ण विश्वास असेल त्यात मी एक कणही संशय घेणार नाही...
Comments
Post a Comment