एक मैत्रीण.....
एक मैत्रीण आहे माझी
नेहमीच सुंदर दिसणारी.....
साधेपणातच सौदर्य आहे
हेच सांगणारी......
एक मैत्रीण आहे माझी
माझ्या सुख दुःखात
स्वतःला घेणारी.....
आणि मग माझ्यासाठी
कधी मुसू-मुसू रडणारी.....
एक मैत्रीण आहे माझी
मला सतत समजावणारी
माझ्या आयुष्याला
एक नवीन वळण लावणारी.....
एक मैत्रीण आहे माझी
जी सर्वांना हवी हवशी वाटणारी....
माझ्या प्रत्येक वेळेस
माझ्या सोबत असणारी.....
#तिच्यावरतीकविता
Comments
Post a Comment