प्रेम म्हणजे काय...(What is Love)
प्रेम म्हणजे नेमकं काय असतं... त्याच्या बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या परिभाषा सांगितल्या आहेत. प्रेम हा विषय येताच डोळ्यासमोर येतो ते म्हणजे एक प्रेमी जोडपं जे खूप प्रयत्नातून लग्न वगैरे करतात अस काहीतरी चित्र डोळ्यासमोर तरंगत. प्रेम हे काही एका दिवसात किंवा एका महिन्यात होत नसत,तर ते फुलाप्रमाणे वाढत असत झाडाप्रमाणे मोठं होत असत.जस झाड मोठं होण्यासाठी त्याला अनुरूप वातावरण, वेळ,परिस्थिती याची सांगड हवी असते.तसच प्रेमाच्या बाबतीतही तसच होत असत प्रेम हे हळू हळू होत जातं ,पण हा ते कधी बदलत नाही. यात आपण आई आणि बाळाचं उदाहरण घेऊ जस की लहानपणी आपल्या आईच आपल्यावर प्रेम असत ,तसच आपलं आईवर प्रेम असतं पण तेव्हा आपल्याला जास्त काही कळत नाही,पण जस जसं आपण मोठं होत जातो तस आपल्याला कळायला लागत आणि मग ते प्रेम वाढून नात घट्ट होत जातं. माझ्या मते प्रेम करण्यापेक्षा ते निभवाव... मग ते निभवायचं कसं... आणि प्रेम म्हणजे काय...? तुम्ही कधी पाण्याला आणि लाटांना कधी वेगळं पाहिलं आहे का ...? नाही ना..! ते प्रेम आहे. तुम्ही कधी पावसाला आणि नभांना वेगळं पाहिलं आहे का..? नाही ना...! ते प्रेम आहे. प्रेम आणि आकर्षण...