दुसऱ्यांदा प्रेम होऊ शकतो का...?


कसं असत माणसाचं मन हे कधीही 2 मतांमध्ये विभागलेलं असत.ते लगेच निर्णय नाही घेऊ शकत.
जो खूप जणांचा मला प्रश्न आहे.
का दुसऱ्यांदा प्रेम होऊ शकत का...? 
मी म्हणतो का नाही होऊ शकत... दुसऱ्यांदा काय 10 वेळा होऊ शकतो.

पहिल्या प्रेमानंतर दुसरं प्रेम होणे हे 100% शक्य आहे.हा पण जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात असतो त्यावेळेस जी dedication दाखवत होतो,तसा सेम दुसऱ्यांदा नाही जमणार पण जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा तुमच्या सतत मनात येत असत का पुढे जाऊ का नको,किंवा तुम्ही त्या दुसऱ्यांदा रिलेशन मधून जाता तेव्हा खूप सांभाळून जाता.जास्त डोक्यावरून गेलं का बरं ठीक आहे जरा सोप्प्या भाषेत समजावतो.
हे बघा ती जी सुरवातीच्या रिलेशन मध्ये तीव्रता असते ना ते पाहून आपण म्हणतो का हा हे प्रेम आहे हा हेच खरं प्रेम आहे.पण जेव्हा ती तुटून जाते तेव्हा आपल्याला असं वाटत का यार आपण इतकी आधी मेहनत घेतली पण त्याचा परिणाम असा मला भेटला.मग मी परत आता तेच करू का..? थोडा मनात संकोच निर्माण होतोच साहजिक आहे.पण हे योग्य नाही त्या व्यक्तीसाठी जो आपल्या आयुष्यात नवीन आलाय तो प्रामाणिक आहे चांगला आहे.पण आपलं असं वागणं त्याच्यासाठी चुकीचं आहे ना.म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा त्या कशाला नाही का...? 
हे बघा तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत emotionally connected कधी होता,जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत आपले सुख दुःख share करता पण तो bonding दोन्ही बाजूने असेल तरच,नाहीतर नाही होऊ शकत.
माझं असं म्हणणं आहे का जर एखादी व्यक्ती emotionally connected होत असेल तर त्याला होऊ द्या,कोण जाणे तो तुमच्यात गुंतला असेल.....
शेवट एवढंच सांगेल का सांभाळून घेणं हे खूप महत्वाचा आहे कारण तुम्हीच सांगू शकता का आतून तुटणं काय असत ते......

Comments

Popular posts from this blog

Motivation

एक मैत्रीण.....