या बेधुंद पावसात तुझी आणि माझी पहिली भेट स्मरते.... हा आठवणीतला पाऊस मन चिंब भिजून वाहते.... तुझ्या नी माझ्या भेटीचं ऋण या पावसाशी मी फेडतो... हा आठवणीतला पाऊस तुझीच आठवण सांगून जातो... या पाऊसात तुला शोधण्यात मीच हरवून जातो... तो आठवणीतला पाऊस तुला ही काहीतरी सांगतो... तू सोडून जाता मला आभाळ भरून येते, या आठवणीतल्या पाऊसात तू, खूप काही सांगून जाते... तुला भिजतांना पाहून मला न भिजवता भिजवून जातो... तो आठवणीतला पाऊस खूप काही सांगून जातो.... त्या पाऊसात दवबिंदू समान शोधत होतो तुला, पण तू त्या प्रत्येक थेंबात विलीन होऊन जातेस... तो पाऊस नेहमीच तुझीच आठवण देऊन जातो... तो आठवणीतला पाऊस खूप काही सांगून जातो....
"Be more concerned about what's right rather than who's right." - Brian Tracy "कोण बरोबर आहे यापेक्षा काय बरोबर आहे याची जास्त काळजी घ्या." - ब्रायन ट्रेसी
Comments
Post a Comment